आमच्याविषयी
श्री स्वामी समर्थ नामस्मरण सेवा (मलेशिया)
"श्री स्वामी समर्थ" या नामातच एक अपार शक्ती सामावलेली आहे. याच नामाच्या ओढीतून, धनत्रयोदशीच्या शुभ दिनी, दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी आमच्या "श्री स्वामी समर्थ नामस्मरण सेवा" या सेवेची स्थापना झाली.
भारतापासून हजारो मैल दूर, मलेशियात राहणाऱ्या आपल्या सर्वांच्या मनात स्वामींबद्दलची भक्ती तेवढीच खोल आहे, जेवढी भारतातील भक्तांच्या मनात आहे. पण परदेशात राहताना, एकत्र येऊन नामस्मरण करण्याची, सेवा करण्याची जी संधी भारतात सहज मिळते, ती इथे दुर्मिळ होती.
हीच उणीव भरून काढण्याच्या भावनेतून, अवघ्या 7-8 स्वामीभक्तांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही स्वामी नामस्मरणाची..सेवा आता तब्बल 50 पेक्षा अधिक.सेवेकरयांनी.जोडली गेली आहे.आणि दिवसागणिक ही संख्या वाढतच जात आहे.
स्वामींच्या नामस्मरणाची ताकद खरंच.इतकी मोठी आहे.की ती शब्दात मांडणे खरंतर खूप कठीण , आणि म्हणूनच की काय परदेशात राहून सुद्धा स्वामींनी दिलेल्या.एका वचनाचा - "भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे" अनुभव - इकडचा प्रत्येक स्वामी भक्त पदोपदी घेत असतो.
मायभूमीपासून दूर असलो, तरी स्वामींचे नाम आपल्याला एका धाग्यात बांधून ठेवते. या सेवेत सहभागी झालेल्या अनेकांना शांतता, सकारात्मक ऊर्जा आणि आयुष्यातील कठीण प्रसंगी स्वामींच्या कृपेचा प्रत्यय आला आहे - काहींनी याला चमत्कार म्हटले, काहींनी मनःशांती म्हटले, पण प्रत्येकाच्या अनुभवात एक समान धागा आहे आणि तो म्हणजे - स्वामींचे अस्तित्व.
आपणही या नामस्मरण सेवेत सहभागी व्हा, स्वामींचे नाम घ्या, आणि अनुभवा ती अनुभूती जी शब्दांत मांडणे कठीण आहे.
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏
स्वामींच्या नामस्मरणामुळे केवळ वैयक्तिक जीवनातच नाही, तर कुटुंब आणि समाजातही सकारात्मक परिवर्तन घडते. जेव्हा अनेक भक्त एकत्र येऊन श्रद्धेने नामस्मरण करतात, तेव्हा निर्माण होणारी आध्यात्मिक ऊर्जा प्रत्येकाच्या जीवनाला नवी दिशा देते. या सेवेमुळे मलेशियातील विविध भागांत राहणारे स्वामीभक्त एका कुटुंबाप्रमाणे जोडले गेले आहेत.
आमचा विश्वास आहे की, स्वामींचे नाम हेच सर्वात मोठे साधन आणि सर्वात मोठे साध्य आहे. नामस्मरणातून मिळणारी मनःशांती, आत्मबल आणि स्वामींवरील दृढ श्रद्धा जीवनातील प्रत्येक आव्हानाला सामोरे जाण्याची शक्ती देते. त्यामुळेच आम्ही प्रत्येक भक्ताला या आध्यात्मिक प्रवासाचा भाग बनण्याचे विनम्र आवाहन करतो.
आज आपण सर्व जण स्वामींच्या कृपेने एका सुंदर सेवाकार्यात सहभागी आहोत. उद्याच्या काळात अधिकाधिक भक्तांना जोडून, सामूहिक नामस्मरण, स्वामींचे विचार आणि सेवाभाव यांचा प्रसार करणे हा आमचा संकल्प आहे. ही सेवा निरंतर वाढत राहो आणि स्वामींचा कृपाशीर्वाद सर्वांवर सदैव राहो, हीच स्वामी चरणी प्रार्थना.
|| भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे ||
स्वामींच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. 🙏