।। श्री स्वामी समर्थ ।।

नित्यसेवा — अनुक्रमणिका

|| श्रीगणेशाय नम: ||

।।श्री स्वामी समर्थ।।

|| श्री स्वामी स्तवन ||


गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः ।

गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः ॥


श्री गणेशाय नम:। श्री सरस्वत्यै नमः ।

श्री गुरुभ्यो नम:। श्री कुलदेवतायै नम:।


श्री अक्कलकोटनिवासी-पूर्णदत्तावतार-दिगंबरयतिवर्य-स्वामीराजाय नम:॥


ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति।

द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्वमस्यादिलक्ष्यम्‌॥

एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतं।

भावातीतं त्रिगुणरहितं सदगुरुं तंनमामि॥


रक्तांगं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहास्यवदनम्, कंथा - टोपी - च -

माला दण्डकमण्डलुधर, कटयांकर, रक्षक, त्रैगुण्यरहित

त्रैलोक्यपालक, विश्वनायक भक्तवत्सल, कलियुगे,

श्रीस्वामीसमर्थावतारधारक पाहि माम्‌। पाहि माम्‌। पाहि माम्‌॥


आता करूया प्रार्थना। जयजयाजी अघहरणा ।

परात्परा कैवल्यसदना। ब्रम्हानंदा यतिवर्या।।

जयजयाजी पुराणपुरुषा। लोकपाला सर्वेशा ।

अनंत ब्रम्हांडाधीशा । वेदवंद्या जगदगुरू ।।

सुखधामनिवासिया । सर्वसाक्षी करुणालया ।

भक्तजन ताराया । अनंतरूपे नटलासी ।।


तू अग्नी तू पवन । तू आकाश तू जीवन ।

तूची वसुंधरा पूर्ण। चंद्र सूर्य तूच पै।।

तू विष्णु आणि शंकर । तू विधाता तू इंद्र ।

अष्टदिकपालादि समग्र । तूच रूपे नटलासी ।।

कर्ता आणि करविता । तूच हवी आणि होता ।

दाता आणि देवविता । तूच समर्थ निश्चये।।

जंगम आणि स्थिर । तूच व्यापिले समग्र ।

तुजलागी आदिमध्याग्र । कोठे नसे पाहता ।।

असोनिया निर्गुण । रूपे नटलासी सगुण ।

ज्ञाता आणि ज्ञान । तूच एक विश्वेशा ।।


वेदांचाही तर्क चाचरे। शास्त्रातेही नावरे।

विष्णुशंकर एकसरे। कुंठीत झाले सर्वही ।।

मी केवळ अल्पमती । करू केवी आपुली स्तुती ।

सहस्त्रमुखही निश्चित । शिणला ख्याती वर्णता ।।

दृढ ठेविला चरणी माथा । रक्षावे मजसी समर्था।

कृपा कटाक्षे दीनानाथा । दासा कडे पाहावे।।

आता इतुकी प्रार्थना । आणावी जी आपुल्या मना ।

कृपा समुद्री या मीना । आश्रय देइजे सदैव ।।

पाप ताप आणि दैन्य । सर्व जावो निरसोन ।

इहलोकी सौख्य देवोन । परलोक साधन करवावे।।

दुस्तर हा भवसागर । याचे पावावया पैलतीर ।

त्वन्नाम तरणी साचार । प्राप्त होवो मजला ते।।

आशा मनीषा तृष्णा । कल्पना आणि वासना ।

भ्रांती भुली नाना । न बाधोत तुझ्या कृपे।।

किती वर्णू आपुले गुण । द्यावे मज सुख साधन ।

अज्ञान तिमिर निरसोन । ज्ञानार्क हृदयी प्रगटो पै।।

शांती मनी सदा वसो । वृथाभिमान नसो ।

सदा समाधान वसो । तुझ्या कृपेने अंतरी ।।

भवदु:ख हे निरसो । तुझ्या भजनी चित्त वसो ।

वृथा विषयांची नसो । वासना या मनाते।।

सदा साधुसमागम । तुझे भजन उत्तम ।

तेणे होवो हा सुगम । दुर्गम जो भवपंथ ।।

व्यवहारी वर्तता । न पडो भ्रांती चित्त ।

अंगी न यावी असत्यता । सत्ये विजयी सर्वदा ।।

आप्तवर्गाचे पोषण । न्यायमार्गावलंबन ।

इतुके द्यावे वरदान । कृपा करुनी समर्था।।

असोनिया संसारात । प्राशीन तव नामामृत ।

प्रपंच आणि परमार्थ। तेणे सुगम मजलागी ।।

कर्ता आणि करविता । तूची एक स्वामिनाथा ।

माझिया ठायी वार्ता। मीपणाची नसे ची ।।


|| गणपती अथर्वशीर्ष ||

ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।

भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः ।

स्थिरैरंगैस्तुष्टुवांसस्तनूभिः ।

व्यशेम देवहितं यदायूः ।

ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः ।

स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः ।

स्वस्ति नस्ताक्ष्यो अरिष्टनेमिः ।

स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु॥

ॐ नमस्ते गणपतये॥१॥

त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि ।

त्वमेव केवलं कर्ताऽसि ।

त्वमेव केवलं धर्ताऽसि ।

त्वमेव केवलं हर्ताऽसि ।

त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।

त्वं साक्षादात्माऽसि नित्यम ॥२॥

ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥३॥

अव त्वं माम । अव वक्तारम । अव श्रोतारम ।

अव दातारम । अव धातारम । अवानूचानमव शिष्यम ।

अव पश्चात्तात । अव पुरस्तात । अव दक्षिणात्तात ।

अवोत्तरात्तात । अव चोर्ध्वात्तात । अवाधरात्तात ।

सर्वतो मां पाहि पाहि समन्तात ॥४॥

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः । त्वमानन्दमयस्त्वं ब्रह्ममयः ।

त्वं सच्चिदानन्दाऽद्वितीयोऽसि । त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ।

त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥५॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते। सर्वं जगदिदं त्वत्तस्तिष्ठति ।

सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति । सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ।

त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः । त्वं चत्वारि वाक् पदानि ।

त्वं गुणत्रयातीतः । त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः ।

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यम । त्वं शक्तित्मकः ।

त्वां योगिनो ध्यायन्ति नित्यम ।

त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं रुद्रस्त्वमिन्द्रस्त्वमग्निस्त्वं

वायुस्त्वं सूर्यस्त्वं चन्द्रमास्त्वं ब्रह्म भूर्भुवस्सुवरोम ॥६॥

गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादींस्तदनन्तरम ।

अनुस्वारः परतरः । अधेन्दुलसितम । तारेण ऋद्धम ।

एतत्तव मनुस्वरूपम ॥७॥

गकारः पूर्वरूपम । अकारो मध्यरूपम ।

अनुस्वारश्चान्त्यरूपम । बिन्दुरुत्तररूपम ।

नादस्संधानम । संहिता संधिः ॥८॥

सैषा गणेशविद्या । गणक ऋषिः ।

निचृद्गायत्री छन्दः । गणपतिदेवता ।

ॐ गं गणपतये नमः ॥९॥

एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि ।

तन्नो दन्तिः प्रचोदयात ॥१०॥

नमो व्रातपतये। नमो गणपतये। नमः प्रमथपतये।

नमस्तेऽस्तु लम्बोदरायैकदन्ताय

विघ्ननाशिने शिवसुताय वरदमूर्तये नमः ॥१२॥

ॐ सह नाववतु। सह नौ भुनक्तु। सह वीर्यं करवावहै।

तेजस्वि नावधीतमस्तु मा विद्विषावहै।

ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः ॥

|| श्री स्वामी समर्थ अष्टक स्तोत्र ||

असें पातकी दीन मीं स्वामी राया | पदी पातलो सिद्ध व्हा उद्धराया ||

नसे अन्य त्राता जगी या दीनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || १ ||

मला माय न बाप न आप्त बंधू | सखा सोयरा सर्व तू दीन बंधू ||

तुझा मात्र आधार या लेकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || २ ||

नसे शास्त्र विद्या कलादीक काही | नसे ज्ञान, वैराग्य ते सर्वथा ही ||

तुझे लेकरु ही अहंता मनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ३ ||

प्रपंची पुरा बद्ध झालो दयाळा | तुझा दास मी ही स्मृती ना मनाला ||

क्षमेची असे याचना त्वत्पदाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ४ ||

मला काम क्रोधाधिकी जागविले | म्हणोनी समर्था तुला जागविले ||

नका दूर लोटू तुझ्या सेवकाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ५ ||

नको अंत पाहू त्वरे धाव घेई | तुझ्यावीण नाही दुजी श्रेष्ठ आई ||

अनाथासि आधार तुझा दयाळा | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ६ ||

कधी गोड वाणी न येई मुखाला | कधी द्रव्य ना अर्पिले याचकाला ||

कधी मूर्ती तुझी न ये लोचनाला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ७ ||

मला एवढी घाल भीक्षा समर्था | मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा ||

घडो पाद सेवा तुझ्या किंकराला | समर्था तुझ्यावीण प्रार्थू कुणाला || ८ ||


|| श्री स्वामी समर्थ तारक मंत्र ||

निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना ।

प्रचंड स्वामीबळ पाठीशी, नित्य आहे रे मना ।

अतर्क्य अवधूत हे स्मर्तुगामी,

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।१।।


जिथे स्वामीचरण तिथे न्युन्य काय,

स्वये भक्त प्रारब्ध घडवी ही माय।

आज्ञेविना काळ ही ना नेई त्याला,

परलोकी ही ना भीती तयाला

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।२।।


उगाची भितोसी भय हे पळु दे,

वसे अंतरी ही स्वामीशक्ति कळु दे।

जगी जन्म मृत्यु असे खेळ ज्यांचा,

नको घाबरू तू असे बाळ त्यांचा

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।३।।


खरा होई जागा श्रद्धेसिहत,

कसा होसी त्याविण तू स्वामिभक्त ।

आठव! किती दा दिली त्यांनीच साथ,

नको डगमगु स्वामी देतील हात

अशक्य ही शक्य करतील स्वामी ।।४।।


विभूति नमन नाम ध्यानादी तीर्थ,

स्वामीच या पंचामृतात।

हे तीर्थ घेइ आठवी रे प्रचिती,

ना सोडती तया, जया स्वामी घेती हाती ।।५।।



|| दत्तात्रेय सिद्ध मंगल स्तोत्रम् ||

श्रीमदनंत श्रीविभूषित अप्पललक्ष्मी नरसिंहराजा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 1 ॥


श्रीविद्याधरि राध सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 2 ॥


माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 3 ॥


सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनार्यनुत श्रीचरणा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 4 ॥


सवितृकाठकचयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभव

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 5 ॥


दोचौपाती देव् लक्ष्मी घन संख्या बोधित श्रीचरणा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 6 ॥


पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भपुण्यफल संजाता

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 7 ॥


सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 8 ॥


पीठिकापुर नित्य विहारा मधुमति दत्ता मंगलरूपा

जय विजयीभव दिग्विजयीभव श्रीमदखंड श्रीविजयीभव ॥ 9 ॥



|| श्री दत्तबावनी ||

जय योगीश्वर दत्त दयाळ । तूंच एक जगती प्रतिपाळ ॥ १॥

अत्र्यनुसये करूनि निमित्त । प्रगटसि जगतास्तव निश्चित ॥ २॥

ब्रह्माऽच्युतशूंकर अवतार । शरणांगतासि तू आधार ॥ ३॥

अंतर्यामी ब्रह्मस्वरूप । बाह्य गुरु नररूप सुरूप ॥ ४॥

काखीं अन्नपूर्णा झोळी । शांति कमंडलु करकमळी ॥ ५॥

कुठें षड्भुजा कोठें चार । अनंत बाहू तूं निर्धार ॥ ६॥

आलो चरणी बाळ अजाण । दिगंबरा, उठ जाई प्राण ॥ ७॥

ऐकुनि अर्जुन-भक्ती-साद । प्रसन्न झाला तूं साक्षात्॥ ८॥

दिधली ऋद्धी सिद्धी अपार । अंती मोक्ष महापद सार ॥ ९॥

केला कां तूं आज विलंब? तुजविण मजला ना आलंब ।। १०॥

विष्णुशर्म द्विज तारुनिया । श्राद्धिं जेंविला प्रेममया ॥ ११॥

जंभे देवा त्रासविले। कृपामृते त्वां हांसविलें॥ १२॥

पसरी माया दितिसुत मूत । इंद्रा करवी वधिला तूत? ॥ १३॥

ऐसी लीला जी जी शर्व । केली, वर्णिल कैसी सर्व? ॥ १४॥

घेई आयु सुतार्थी नाम । केला त्यातें तूं निष्काम ॥ १५॥

बोधियले यदु परशुराम । साध्य देव प्रह्लाद अकाम ॥ १६॥

ऐसी ही तव कृपा अगाध । कां न ऐकसी माझी साद ॥ १७॥

धांव अनंता, पाहि न अंत । न करी मध्येच शिशुचा अंत ॥ १८॥

पाहुनि द्विजपत्नीकृत स्नेह । झाला सुत तूं निःसंदेह ॥ १९॥

स्मर्तुगामी कलितार कृपाळ । जडमूढ रजका तारी दयाळ ॥ २०॥

पोटशुळी द्विज तारियला । ब्राह्यणश्रेष्ठी उद्धरिला ॥ २१॥

सहाय कां ना दे अजरा? । प्रसन्न नयने देख जरा ॥ २२॥

वृक्ष शुष्क तूं पल्लविला । उदास मजविषयी झाला ॥ २३॥

वंध्या स्त्रीची सुत-स्वप्नें। फळली झाली गृहरत्नें॥ २४॥

निरसुनि विप्रतनुचे कोड । पुरवी त्याच्या मनिचें कोड ॥ २५॥

दोहविली वंध्या महिषी । ब्राह्मण दारिद्र्या हरिसी ॥ २६॥

घेवडा भक्षुनि प्रसन्न-क्षेम । दिधला सुवर्णघट सप्रेम ॥ २७॥

ब्राह्मण स्त्रीचा मृत भ्रतार । केला सजीव, तूं आधार ॥ २८॥

पिशाच्च पीडा केली दूर । विप्रपुत्र उठवीला शूर ॥ २९॥

अंत्यज हस्तें विप्रमदास । हरुनी रक्षिले त्रिविक्रमास ॥ ३०॥

तंतुक भक्ता क्षणांत एक । दर्शन दिधले शैलीं नेक ॥ ३१॥

एकत्र वेळी अष्टस्वरूप । झाला असेसी, पुन्हां अरूप ॥ ३२॥

तोषविले निज भक्त सुजात । दावुनि प्रचिती साक्षात ॥ ३३॥

हरला यवननृपाचा कोड । समता ममता तुजला गोड ॥ ३४॥

राम-कन्हैया रूपधरा । केल्या लीला दिगंबरा! ॥ ३५॥

शिला तारिल्या, गणिका, व्याध । पशुपक्षी तुज देती साद ॥ ३६॥

अधमा तारक तव शुभ नाम । गाता किती न होती काम ॥ ३७॥

आधि-व्याधि-उपाधि-गर्व। टळती भावें भजतां सर्व॥ ३८॥

मूठ मंत्र नच लागे जाण । पावे नर स्मरणे निर्वाण ॥ ३९॥

डाकिण, शाकिण, महिषासूर । भूतें, पिशाच्चें, झिंद, असूर ॥ ४०॥

पळती मुष्टी आवळुनी । धून-प्रार्थना-परिसोनी ॥ ४१॥

करुनि धूप गाइल नेमें। दत्तबावनी जो प्रेमें॥ ४२॥

साधे त्याला इह परलोक । मनी तयाच्या उरे न शोक ॥ ४३॥

राहिल सिद्धी दासीपरी । दैन्य आपदा पळत दुरी ॥ ४४॥

नेमें बावन गुरुवारी । प्रेमें बावन पाठ करी ॥ ४५॥

यथावकाशे स्मरी सुधी । यम ना दंडे त्यास कधी ॥ ४६॥

अनेक रूपी हाच अभंग । भजतां नडे न मायारंग ॥ ४७॥

सहस्र नामें वेष अनेक । दत्त दिगंबर अंती एक ॥ ४८॥

वंदन तुजला वारंवार । वेद श्वास हें तव निर्धार ॥ ४९॥

थकला वर्णन करतां शेष । कोण रंक मी बहुकृत वेष ॥ ५०॥

अनुभवतृप्तीचे उद्गार । ऐकुनी हंसताखाइल मार ॥ ५१॥

तपसी तत्त्वमसी हा देव । बोला जयजय श्री गुरुदेव ॥ ५२॥

॥ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॥

|| श्री कालभैरव अष्टक स्तोत्र ||

देवराज सेव्यमानपावनाङ्घ्रिपङ्कजं व्यालयज्ञसूत्रमिन्दुशेखरं कृपाकरम

नारदादियोगिवृन्दवन्दितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥ १॥


भानुकोटिभास्वरं भवाब्धितारकं परं नीलकण्ठमीप्सितार्थदायकं त्रिलोचनम

कालकालमम्बुजाक्षमक्षशूलमक्षरं काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥२॥


शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयम ।

भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिका पुराधिनाथ कालभैरवं भजे॥३॥


भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहम

विनिक्वणन्मनोज्ञहेमकिङ्किणीलसत्कटिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥४॥


धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशकं कर्मपाशमोचकं सुशर्मदायकं विभुम

स्वर्णवर्णशेषपाशशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥५॥


रत्नपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनम ।

मृत्युदर्पनाशनं कराळदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥६॥


अट्टहासभिन्नपद्मजाण्डकोशसन्ततिं दृष्टिपातनष्टपापजालमुग्रशासनम ।

अष्टसिद्धिदायकं कपालमालिकन्धरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥७॥


भूतसङ्घनायकं विशालकीर्तिदायकं काशिवासलोकपुण्यपापशोधकं विभुम ।

नीतिमार्गकोविदं पुरातनं जगत्पतिं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे॥८॥


कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनम

शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं ते प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं ध्रुवम ॥९॥

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचितं कालभैरवाष्टकं संपूर्णम ॥


|| श्री गायत्री मंत्र || (२४ वेळा)

ॐ भूर्भुवः स्वः । तत्सवितुर्वरेण्यं

भगो देवस्य धीमहि। धियो यो नः प्रचोदयात्॥


॥ महामृत्युंजय मंत्र जप ॥ (११ वेळा)

ॐ त्र्यम्बकं यजामहे, सुगन्धिं पुष्टिवर्धनम ।

उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीय मामृतात ॥


श्री स्वामी समर्थ जप ( ३ माळ)


|| स्वामी समर्थ १०८ नामावली ||

  1. ॐ दिगंबराय नमः
  2. ॐ वैराग्यांबराय नम:
  3. ॐ ज्ञानांबराय नमः
  4. ॐ स्वानदांबराय नमः
  5. ॐ अतिदिव्यतेजांबराय नमः
  6. ॐ काव्यशक्तिप्रदायिने नमः
  7. ॐ अमृतमंत्रदायिने नमः
  8. ॐ दिव्यज्ञानादत्ताय नमः
  9. ॐ दिव्यचक्षुदायिने नमः
  10. ॐ चित्ताकर्षणाय नमः
  11. ॐ चित्तशांताय नमः
  12. ॐ दिव्यानुसंधानप्रदायिने नमः
  13. ॐ सद्गुणविवर्धनाय नम:
  14. ॐ अष्टसिध्दिदायकम नमः
  15. ॐ भक्तिवैराग्यदत्ताय नमः
  16. ॐ मुक्तिभुक्तिशक्तिप्रदायने नमः
  17. ॐ आत्मविज्ञानप्रेरकाय नमः
  18. ॐ अमृतानंददत्ताय नमः
  19. ॐ गर्वदहनाय नम :
  20. ॐ षङरिपुहरिताय नमः
  21. ॐ भक्तसंरक्षकाय नम :
  22. ॐ अनंतकोटिब्रम्हांडप्रमुखाय नमः
  23. ॐ चैतन्यतेजसे नमः
  24. ॐ श्रीसमर्थयतये नमः
  25. ॐ आजानुबाहवे नमः
  26. ॐ आदिगुरवे नम :
  27. ॐ श्रीपादवल्ल्भाय नमः
  28. ॐ नृसिंहभानुसरस्वत्ये नमः
  29. ॐ अवधूतदत्तात्रैय नम :
  30. ॐ चंचलेश्वराय नमः
  31. ॐ कुरवपुरवासिने नमः
  32. ॐ गंधर्वपुरवासिने नमः
  33. ॐ गिरनारवासिने नमः
  34. ॐ श्रीकौशल्यनिवासिने नम:
  35. ॐ ओंकारवासिने नमः
  36. ॐ आत्मसूर्याय नमः
  37. ॐ प्रखरतेजा प्रचतिने नमः
  38. ॐ अमोघतेजानंदाय नमः
  39. ॐ तेजोधराय नमः
  40. ॐ परमसिध्दयोगेश्वराय नमः
  41. ॐ कृष्णानंद अतिप्रियाय नमः
  42. ॐ योगिराजेश्वरया नम :
  43. ॐ अकारणकारुण्यमूर्तये नमः
  44. ॐ चिरंजीवचैत्यन्याय नमः
  45. ॐ स्वनंदकंदस्वामिने नमः
  46. ॐ स्मर्तृगामिने नमः
  47. ॐ भक्तचिंतामणिश्वराय नमः
  48. ॐ नित्यचिदानंदाय नमः
  49. ॐ अचिंत्यनिरंजनाय नमः
  50. ॐ दयानिधये नमः
  51. ॐ भक्तचिंतामणीश्वराय नमः
  52. ॐ शरणागतकवचाय नमः
  53. ॐ वेदस्फूर्तिदायिने नमः
  54. ॐ महामंत्रराजाय नमः
  55. ॐ अनाहतनादप्रदानाय नमः
  56. ॐ सुकोमलपादांबुजाय नमः
  57. ॐ चित्शक्यात्मने नमः
  58. ॐ अतिस्थिराय नमः
  59. ॐ माध्यन्हभिक्षाप्रियाय नमः
  60. ॐ प्रेमभिक्षांकिताय नमः
  61. ॐ योगक्षेमवाहिने नमः
  62. ॐ भक्तकल्पवृ़क्षाय नमः
  63. ॐ अनंतशक्तीसूत्रधराय नमः
  64. ॐ परब्रह्माय नमः
  65. ॐ अनितृप्तपरमतृप्ताय नमः
  66. ॐ स्वावलंबनसूत्रदाये नमः
  67. ॐ बाल्यभावप्रियांय नमः
  68. ॐ भक्तिनिधनाय नमः
  69. ॐ असमर्थसामर्थ्यदायिने नमः
  70. ॐ योगसिध्ददायकम नमः
  71. ॐ औदुंबरप्रियाय नमः
  72. ॐ यजसुंकोमतलनुधारकाय नम:
  73. ॐ त्रिमूर्तिध्वजधारकाय नमः
  74. ॐ चिदाकाशव्याप्ताय नमः
  75. ॐ केशरचंदनकस्तूरीसुगंधप्रियाय नमः
  76. ॐ साधक संजीवन्यै नमः
  77. ॐ कुंडलिनीस्फूर्तिदात्रे नमः
  78. ॐ अक्षरवालाय नमः
  79. ॐ आनंदवर्धनाय नमः
  80. ॐ सुखनिधानाय नमः
  81. ॐ उपमातिते नमः
  82. ॐ भक्तिसंगीतप्रियाय नमः
  83. ॐ अकारणसिध्दिकृपाकारकाय नमः
  84. ॐ भवभयभंजनाय नमः
  85. ॐ स्मितहास्यानंदाय नमः
  86. ॐ संकल्पसिध्दाय नमः
  87. ॐ संकल्पसिध्दिदात्रे नमः
  88. ॐ सर्वबंधमोक्षदायकाय नमः
  89. ॐ ज्ञानातीतज्ञानभास्कराय नमः
  90. ॐ श्रीकिर्तीनाममंत्राभ्यों नमः
  91. ॐ अभयवरददायिने नमः
  92. ॐ गुरुलीलामृत धाराय नमः
  93. ॐ गुरुलीलामृतधारकाय नमः
  94. ॐ वज्रसुकोमलहृदयधारिणे नमः
  95. ॐ सुविकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः
  96. ॐ निर्विकल्पातीतसहजसमाधिभ्यों नमः
  97. ॐ त्रिकालातीतत्रिकालज्ञानिने नमः
  98. ॐ भावातीतभावसमाधिभ्यों नमः
  99. ॐ ब्रंह्मातीत – अणुरेणुव्यापकाय नमः
  100. ॐ त्रिगुणातीतसगुणसाकारसुलक्षणाय नमः
  101. ॐ बंधनातीतभक्तिकिरणबंधाय नमः
  102. ॐ देहातीतसदेहदर्शनदायकाय नमः
  103. ॐ चिंतनातीतसदेहदर्शनदायकाय नमः
  104. ॐ मौनातीत – उन्मनीभावप्रियाय नमः
  105. ॐ बुध्दयतीतसद् बुध्दिप्रेरकाय नमः
  106. ॐ मत् प्रिय – पितामहसद् गुरुभ्यों नमः
  107. ॐ पवित्रमात्यसाहेबचरणाविदभ्यो नमः
  108. ॐ अक्कलकोट स्वामी समर्थाय नमः!!



|| गणपती आरती ||

सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची |

नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची |

सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची |

कंठी झळके माळ मुक्ताफळाची || १ ||


जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती ||

रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा |

चंदनाची उटी कुंकुमकेशरा |

हिरे जडित मुकुट शोभतो बरा |

रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया || 2 ||


लंबोदर पितांबर फनी वरवंदना |

सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना |

दास रामाचा वाट पाहे सदना |

संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना |

जय देव जय देव जय मंगलमूर्ती |

दर्शनमात्रे मनकामना पुरती || ३ ||



|| श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती ||

जय जय सद्-गुरु स्वामी समर्था ,

आरती करु गुरुवर्याँ रे ।

अगाध महिमा तव चरणांचा,

वर्णाया मति देया रे॥धृ॥


अक्कलकोटी वास करुनिया,

दाविली अघटित चर्याँ रे।

लीलापाशे बद्ध करुनिया,

तोडिले भवभया रे॥१॥


यवन पुछिले स्वामी कहाँ है,

अक्कलकोटी पहा रे ।

समाधी सुख ते भोगुन बोले,

धन्य स्वामीवर्याँ रे॥२॥


जाणिसे मनीचे सर्व समर्था,

विनवू किती भव हरा रे ।

इतुके देई दीनदयाळा,

नच तव पद अंतरा रे॥३॥



|| स्वामी समर्थ गजर || श्री स्वामी जयजयकार |

दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा

स्वामी समर्थ माझे आई माझा ठाव द्यावा पायी


|| श्री स्वामी समर्थ मानस पूजा ||

नमो स्वामी राजम दत्तावतारम || श्री विष्णु ब्रम्हा शिवशक्ति रूपम ||

ब्रम्ह स्वरूपाय करूणा कराय || स्वामी समर्थाय नमो नमस्ते ||


हे स्वामी दत्तात्रया हे कृपाळा || मला ध्यान मूर्ती दिसू देई डोळा ||

कुठें माय माझी म्हणे बाळ जैसा || समर्था तुम्हा विण हो जीव तैसा || १ ||


स्वामी समर्था तुम्ही स्मतृगामी || हृदयासनी या बसा प्रार्थितो मी ||

पूजेचे यथासांग साहित्य केले || मखरांत स्वामी गुरू बैसविले || २ ||


महाशक्ति जेथे उभ्या ठाकताती || जिथें सर्व सिद्धी पदी लोळताती ||

असे सर्व सामर्थ्य तो हा समर्थ || परब्रह्म साक्षात गुरूदेव दत्त || ३ ||


सुवर्ण ताटी महारत्न ज्योती || ओवाळोनी अक्षता लावू मोती ||

शुभारंभ ऐसा करूनी पूजेला || चरणा वरी ठेवूया मस्तकाला || ४ ||


हा अर्ध्य अभिषेक स्वीकारी माझा || तुझी पाद्य पूजा करी बाळ तुझा ।।

प्रणिपात साष्टांग शरणागताचा || तुम्ही वाहिला भार या जीवनाचा || ५ ||


ही ब्रम्हपूजा महाविष्णू पूजा || शिव शंकराची असें शक्तिपूजा ||

दहीदुध शुद्धोदकाने तयाला || पंचामृती स्नान घालू प्रभूला || ६ ||


वीणा तुतार्‍या किती वाजताती || शंखादि वाद्ये पहा गर्जताती ।।

म्हणती नगारे गुरूदेव दत्त || श्री दत्त जय दत्त स्वामी समर्थ || ७ ||


प्रत्यक्ष गंगा जलकुंभी आली || श्री दत्तस्वामीसिया स्नान घाली।।

महासिद्ध आलें पदतीर्थ घ्याया || महिमा तयांचा कळता जगा या || ८ ||


मीं धन्य झालो हे तीर्थ घेता || घडू दे पूजा ही यथासांग आता।।

अजानबाहू भव्य कांती सतेज || नसे मानवी देह हा स्वामीराज || ९ ||


प्रत्यक्ष श्रीसदगुरू दत्तराज || तया घालुया रेशिमी वस्त्र साज ||

सुगंधित भाळी टीळा रेखियेला || शिरी हा जरीटोप शोभे तयाला || १० ||


वक्षस्थळी लाविल्या चंदनाचा || सुवास तो वाढवी भाव साचा ||

शिरी वाहूया बिल्व तुलसीदलाते || गुलाब जाई जुई अत्तराते || ११ ||


गंधाक्षता वाहूनीया पदाला || ही अर्पूया जीवन पुष्प माला ||

चरणी करांनी मिठी मारू देई || म्हणे लेकरासी सांभाळ आई || १२ ||


इथें लावुया केशर कस्तुरीचा || सुगंधीत हा धूप नानाप्रतिचा ||

पुष्पांजली ही तुम्हा अर्पियेली || गगनांतूनी पुष्प वृष्टी जहाली || १३ ||


करूणावतारी अवधूत कीर्ति || दयेची कृपेचीं जशी शुद्धमूर्ती ||

प्रभा फाकली शक्तिच्या मंडलांची || अशी दिव्यता स्वामी योगेश्र्वरांची || १४ ||


हृदमंदिराची ही स्नेह ज्योती || मला दाखवी स्वामिची योगमुर्ति ||

करू आरती आर्त भावे प्रभूची || गुरूदेव स्वामी दत्तात्रयाची || १५ ||


पंचारती ही असे पंचप्राण || ओवाळूनी ठेवू चरणा वरून ||

निघेना पुढें शब्द बोलू मी तोही || मनीचें तुम्ही जाणता सर्व काहीं || १६ ||


हे स्वामीराजा बसा भोजनाला || हा पंचपक्वान्न नैवेद्य केला ||

पुरणाची पोळी तुम्हा आवडीची || लाडू करंजी असें ही खव्याची || १७ ||


डाळिंब द्राक्षें फळें आणि मेवा || हे केशरी दूध घ्या स्वामीदेवा ||

पुढें हात केला या लेकरानें || प्रसाद द्यावा आपुल्या करानें || १८ ||


तांबुल घ्यावा स्वामी समर्था || चरणाची सेवा करू द्यावी आता ||

प्रसन्नतेतून मागू मी काय || हृदयी ठेव माते तुझे दोन्हीं पाय || १९ ||


सर्वस्व हा जीव चरणीच ठेवू || दुजी दक्षिणा मी तुम्हां काय देऊ ||

नको दूर लोटू आपुल्या मुलासी || कृपा छत्र तुमचेच या बालकासी || २० ||


धरू दे आता घट्ट तुझ्या पदाला || पदी ठेवू दे शीर शरणा गताला ||

हृदयी भाव यावें असे तळमळीचे || करी पुर्ण कल्याण जे या जिवाचे || २१ ||


तुझें बाळ पाही तुझी वाट देवा || नका वेळ लावू कृपाहस्त ठेवा ||

मनी पूजनाची असे दिव्य ठेव || वसो माझीया अन्तरी स्वामी देव || २२ ||

|| श्री दत्तार्पणमस्तु || श्रीगुरूदेव दत्त ||

|| श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रार्थना ||

सदगुरु नाथा हात जोडितो अंत नको पाहु।

उकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू॥धृ०॥


निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तुकिती तुज शीण देऊ।

ह्रदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहु॥१॥


उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू।

बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ॥२॥


कोण कुठील मी कवण कार्यमम जनी कैसा राहू।

करी मज ऐसा निर्भय निश्चल सम किला पाहू॥३॥


अजाण हतबल भ्रमित मनीची तळमळ कशी साहू।

निरसुनी माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू॥४॥



|| क्षमा प्रार्थना ||

जय जय दत्ता अवधुता

अक्कलकोट स्वामी समर्था

सद्गुरू दिगंबरा भगवंता

दया करी गा मजवरी


अनेकांच्या संकटी आला धावुन

आत्ता माझी प्रार्थना ऐकून

समर्थाराय देई दर्शन दूर लोटू नको मला


व्यवहारी मी जगतो जीवन ,

अनेक पापे घडती हातून

तव नामाचे होते विस्मरण क्षमा याची आसवी


सद्गुरूराय कृपा करावी

तुमची सेवा नित्य घडावी

ऐसी बुद्धी मजला द्यावी

पापे सर्व पळावी


सुखाचे व्हावे जीवन ऐहिक

धन, दौलत मिळावे, मिळावे पुत्र पोत्र सुख

गृहसुख आणि वाहनसुख

अंती सद्गती लाभावी


तुम्ही प्रतक्ष कैवल्य ठेवा

मानून याचना करतो देवा

उदार मनाने वर द्यावा आणि तथास्थु म्हणावे


तुमची होता कृपा पूर्ण

जीवन माझे होईल धन्य

म्हणून आलो तव पायी शरण , दत्त राया दयाघन


मी एक मानव सामान्य , तुमची सेवा नित्य घडावी मनून

करतो तुमचे नामस्मरण

दान द्या तुमच्या कृपेचे


वेडीवाकडी माझी सेवा

स्वीकारावी स्वामीदेवा

वरदहस्त नित्य मस्तकी ठेवा हीच अंती विनंती

श्री स्वामी समर्थ महाराज की जय
अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

|| श्री स्वामी जयजयकार ||

श्री सदगुरु अक्कलकोट निवासी

राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय।

अनंतकोटी ब्रह्मांडनायक भक्तवत्सल भक्ताभिमानी

श्रीपाद श्रीवल्लभ विजयदत्त गुरुदेव दत्त समर्थ

श्री गायत्री माता की जय ।

श्री गुरु महाराज की जय ।

श्रीपाद श्री वल्लभ महाराज कि जय ||

श्री नरसिंह सरस्वती महाराज कि जय ||

अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त।

|| ॐ शांती शांती शांती ||